भूमिपुत्र च्या वर्धापन दिनानिमित्त  'शेतकरी वारकरी' परिषदचे आयोजन

 _उकंडी ढेंबरे वाशिम जिल्हा प्रतिनिधी_ 

     भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त    हरीबापु नगर कोठा ता. मालेगांव जि. वाशिम येथे रविवार दि 1 जानेवारी ला भव्य 'शेतकरी वारकरी' परिषदचे आयोजन करण्यात आले आसुन या परिषदेत 
* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज देण्यात यावी.
* पीक विमा योजनेत धोरणात्मक बदल करण्यात यावा.
* राज्यातील वारकरी शिक्षण संस्थाना अनुदान देण्यात यावे.
* राज्यात मागेल त्या शेतकऱ्यांला सिंचन विहीर देण्यात यावी.
     वरील चार ठरव घेऊन राज्य व केंद्र शासनाला पाठवले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या हस्ते भागातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व दिंडीचालक यांचा सत्कार होणार असून भूमिपुत्र दिनदर्शिकेचे लोकार्पण  मान्यवरांच्या हस्ते होणार 
आसल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले. 
       शेतकरी वारकरी परिषदेचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. सीताराम महाराज खानझोडे हे राहणार आहेत. येवता येथिल महंत शांतीपुरी महाराज व हभप काशीनाथ महाराज बाजड यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार भावनाताई गवळी, आमदार अमित झनक, मा. आ. विजयराव जाधव, युवा नेते अनुप धोत्रे यांच्या हस्ते  होणार आहे . कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा विदर्भातील शेतकरी चळवळीचे नेते  प्रकाशभाऊ पोहरे तथा भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे राहणार आहेत. 
      प्रमुख उपस्थितीत पंचायती महानिर्वाणी आखाडा भर जहागीर चे मठाधिपती रमेशगीर महाराज, संत गोपाल बाबा रतन गड, कल्याण महाराज जोशी अध्यक्ष लोणी स.म., मंहत दुर्गादास महाराज, हभप अभिमन्यू महाराज बाजड,   श्रीराम महाराज नवघरे, हभप गंगाधरजी मुंढे, हभप गणेश महाराज हुबांड, हभप मंगेश महाराज जाधव, हभप प्रकाश घुगे, हभप राम सरकटे, हभप मदन काठोळे, हभप मनोहर अवचार, हभप भागवत महाराज, हभप शिवाजी भोयर यांच्यासह भागातील  वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक , दिंडीचालक व वारकरी शिक्षण संस्था चालक मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. भूमिपुत्र चे राज्य संघटक व प्रवक्ते डाॅ. जितेंद्र गवळी, प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ शेवाळे, भास्करराव बेंगाळसर, राज्य समन्वयक माधव हिवाळे,  जिल्हाकार्यध्यक्ष उत्तमराव आरू, जिल्हा प्रवक्ते देव इंगोले, महीला जिल्हाध्यक्षा संगीताताई मार्गे, संतोष सुर्वे, सचिन काकडे यांच्यासह राज्यभरातील भूमिपुत्र चे सर्व जिल्ह्य़ातील जिल्हाध्यक्ष, महीला  जिल्हाध्यक्षां सह भूमिपुत्रचे सर्व पदाधिकाऱी व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.  वर्धापन दिनानिमित्त    भागातील शेतकर्यांसाठी मोफत सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामधे हृदय रोगनिदान, नेत्र रोग, नाक, कान, घसा., दंत रोग, मूळव्याध, मधुमेह, हाडाचे आजार व इतर सर्व प्रकाराच्या आजाराचे निदान करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर महेश बोडखे, डाॅ. धनंजय सुलताने, डाॅ. सागर ठाकूर, डाॅ. उज्ज्वल टाकाईत, डाॅ. सोनाली टाकाईत, डाॅ. तृप्ती गवळी, डाॅ. अनिल कावरखे, डाॅ. वैभव देशमुख, डाॅ. उमेश भुतेकर, डाॅ. राम बोडखे सह तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.  आर्यावर्त पॅरामेडिकल काॅलेज  कडुन मोफत रक्त व मधुमेह तपासणी कली जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, मालेगांव तालुकाध्यक्ष विनोद घुगे, शाखाप्रमुख प्रभाकर अवचार, उपप्रमुख शिवराज अवचार सह गावकरी कोठा व भूमिपुत्र शेतकरी संघटनां वाशिम जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog