दिव्यांग दिन व सखाराम महाराज यात्रे निमित्त भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे नेत्र शिबिर संपन्न ....
_उकंडी ढेंबरे वाशिम जिल्हा प्रतिनिधी_
दिव्यांग दिनानिमित्त भूमिपुत्र
शेतकरी संघटना, उदयगीरी नेत्र रूग्णालय उदगिर व कावेरी नेत्रालय रिसोड यांच्या वतीने लोणी सखाराम महाराज येथे मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक सखाराम महाराज विद्यालय येथे करण्यात आले होते.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात. लोणी यात्रेनिमित्त येथील सखाराम महाराज विद्यालय येथे शनिवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सखाराम महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्राचार्य कल्याण महाराज जोशी हे होते. प्रमुख उपस्थितीत सरपंच रवी चोपडे, श्रीरंग नागरे , पंढरी नरवाडे, महावीर सिंह ठाकूर, कावेरी नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉ. संतोष खडसे, युवक उपजिल्हाप्रमुख रवि पाटिल जाधव, माणिक कांबळे, भागवत मामा बोडखे, शुभम टकले, समाधान घोळवे,गजानन खंदारे, मेघराज पंसारी, समाधान गाडे, सुभाष बोडखे सह भूमिपुत्र चे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संखेने उपस्थित होते.
यावेळी दीडशे पेक्षा अधिक रुग्ण यांची कम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी करून चष्मा उपलब्ध करून देण्यात आला . गरजेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उदयनगिरी नेत्र रुग्णालय उदगीर यांचे कडून ही शस्त्रक्रिया मोफत अथवा अल्प दरात करून दिली जाणार आहे .
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने या तपासणी शिबिरासाठी प्रयत्न करून यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरे सर यांनी केले तर शेवटी आभार ठाकूर यांनी मांडले
Comments
Post a Comment