इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज......
शिवभक्त परिवार व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 जानेवारी रोजी स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते, लेफ्टनंट कर्नल ओमप्रकाश घोरपडी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे यांनी दिली.
इंदापूर महाविद्यालयात दरवर्षी 12 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी होत असते.
या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सर्व आजी - माजी सैनिक, SRPF, CRPF यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन करण्यात येणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील अमर शहीद लक्ष्मण संतू डोईफोडे (बोराटवाडी) यांच्या वीरपत्नी श्रीमती सुवर्णाताई लक्ष्मण डोईफोडे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार सर्व मान्यवरांच्या व शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवभक्त परिवार, इंदापूर यांचे वतीने सन्मानपूर्वक दिला जाणार आहे.
Comments
Post a Comment