उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी होण्यासाठी योगा करा.. ..

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

 इंदापूर तालुका प्रतिनिधी.....धनश्री गवळी, माय मराठी न्यूज.....

पाच हजार वर्षांपूर्वी  सुरू झालेली योगसाधना स्वामी रामदेवजी बाबांनी समाजापर्यंत पोहोचवली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला जागतिक मान्यता प्राप्त करून दिली. नियमित योगा केल्याने शरीर आणि मन सदृढ होते शारीरिक क्षमता,सकारात्मकता, आत्मविश्वास वाढते आणि जीवन जगण्याचा आनंद घेता येतो उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी होण्यासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे आवश्यक आहे इंदापूर मध्ये योगाची जनजागृती चांगली असून युवा सप्ताहाच्या माध्यमातून युवकापर्यंत योगा पोहोचवण्याचे काम कौतुकास्पद आहे या कार्यासाठी इंदापूर मध्ये अध्ययवत आणि सुसज्ज असे योग भवन उभारले जाणार असल्याचे मत माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवायोग सप्ताह योगशिबीरामध्ये सहभागी होत झुंबा,योगसाधना करण्याचा आनंद हर्षवर्धन पाटील यांनी घेतला..

  यावेळी समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी अष्टांग योगाची आठ अंगाविषयी विस्तृत विवेचन करीत उपस्थितांना जीवनात योग का करणे आवश्यक आहे याविषयी व्याख्यान दिले.
 युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे युवा प्रभारी सचिन पवार अण्णासाहेब चोपडे रामेश्वरजी साठे यांनी योग प्राणायम प्रात्यक्षिकाचे  मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अॅड.गिरीश शहा मा.नगरसेवक गोरख शिंदे उद्योजक मच्छिंद्र शेटे जलतज्ञ अनिल पाटील टोल प्लाजा चे मॅनेजर सतिश चव्हाण प्राचार्य जयंत नायकुडे ,रणजीत भोंगळे अॅड. जालिंदर बसळे, प्रशांत हेळकर या मान्यवरांसह विविध महाविद्यालयातील युवक युती आणि बहुसंख्येने योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान न्यासचे अध्यक्ष जयकुमार शिंदे बिभिषन खबाले पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे , काशिनाथ पारेकर, देवराव मते,हमीदभाई आत्तार, विकास खिलारे किसन पवार ,गोकुळ हराळे, शंकर काशीद,समाधान भोरकडे  मंगेश घाडगे प्रविण सदाफुले सायराभाभी आत्तार रेखाताई भंडारी जयश्री खबाले, अलका जगताप, यांनी परिश्रम घेतले. चंद्रकांत देवकर आणि राजेंद्र चव्हाण यांनी हा हास्यासन घेऊन सर्वांना मनसोक्त हसविले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र भोसले यांनी केले.शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog