माजी राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय(मामा) भरणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळेच इंदापूर तालुक्यातील रस्त्यांना निधी मिळणार......

 जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांची माहिती

इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज.....

 माजी राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय(मामा) भरणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी सुमारे 11.09 कोटी इतका निधी मंजूर होणार असून या कामांना लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.या विषयी विस्तृतपणे बोलताना श्री.सपकळ यांनी सांगितले की,गेल्या अनेक वर्षापासून सदरील रस्त्यांची कामे  प्रलंबित असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे या रस्त्यांची कामे मार्गी लागावीत म्हणून सातत्याने जनतेची मागणी होती.या मागणीची दखल घेत माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या मागणीनुसार महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शिफारसीनुसार गेल्या दिड वर्षांपासून सातत्याने यशस्वी पाठपुरावा करून या रस्त्यांना मंजूरी मिळावी म्हणुन दि.13/08/2020 रोजीच्या जा.क्र.पुणे/शासन.इतर/09/2020 पत्र व्यवहार अन्वये या रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मधून मंजुरी मिळवली आहे.यामध्ये  *1.उध्दट ते पवारवाडी-मोहितेवाडी- कर्दनवाडी लहीरोबनगर रस्ता  (लांबी 8 कि.मी.) - अंदाजपत्रकीय रक्कम 5.76 कोटी* तसेच *2.बावडा-बारावा फाटा-बोकुडदरा -शेटफळ हवेली ग्रा.मा.76 (लांबी-6|670 कि.मी.) रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 5.33 कोटी*  इतक्या निधीचे अंदाजपत्रक  झाले असल्याचे सांगत ते म्हणाले कि,या कामांना एक-दोन दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता मिळणार. या दोन्ही रस्त्यांना आदरणीय मामांच्या माध्यमातून लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून ही कामे ताबडतोब मार्गी लागतील असे सांगून ते पुढे म्हणाले की
वास्तविक विरोधकांचा या कामाशी दुरान्वये संबंध नाही,त्यांना कसलाही अधिकार नाही अशी जनतेने विश्रांती दिलेली मंडळी केवळ सवंग प्रसिद्धीसाठी फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.ते म्हणाले की,विरोधकांना विकासावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही,असे सचीन सपकळ यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog