इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज.....
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची माहिती माननीय पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सा. यांना देऊन त्यांच्या आदेशाने मौजा लाखेवाडी येथील ०२ इसम उसाच्या शेता मध्ये शरीरास अपायकारक रसायन तयार करून शेत शिवारमध्ये प्रोहिबिशन रेड अनुषंगाने धाड टाकून अवैध्य हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. सदरच्या प्रोहिबिशन रेड मध्ये एकूण २१२०००/-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील इसमांवरती भारतीय दंड विधान संहिता कलम ३२८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची तसेच अवैधरित्या मटका चालवणारे ०२ इसम यांच्या वरती रेड करून ३१०० /-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आले. महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई दरम्यान एकूण २१५१००/-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सा, यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक हेगडे, पोलीस शिपाई दिनेश कांबळे व शिंदे यांनी मिळून केली.
Comments
Post a Comment