इंदापूर तालुक्यातील पवारांचे खंदे समर्थक महारुद्र पाटील,वसंतराव आरडे यांचा शिवसेना शिंदे गटात, प्रवेश.....
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज.....
इंदापूर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. यानंतर शिवेसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत वेगळा गट स्थापन केला. यानंतर अनेकांचा ओढा या शिंदे गटाकडे जाण्याचा दिसत आहे.पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले इंदापूर चे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,वसंतराव आरडे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे
यांनीसुद्धा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच महारुद्र पाटील यांनी सहकार्या समवेत शिंदे गटातील माजीमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच महारुद्र पाटील व वसंतराव आरडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.पण ही माहिती आता खरी ठरली आहे. कारण आपण अनेक जण आमच्या सोबत आहेत, शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती महारुद्र यांनी दिली आहे. दरम्यान, महारुद्र पाटील व वसंतराव आरडे शिंदे गटामध्ये जाण्याच्या निर्णयाने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे. नेते दिलेला शब्द पाळत नाहीत, जनतेची दिशाभूल करीत आहेत, कार्यकर्त्याचा वापर करून बाजूला टाकले जाते, जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादीत काही अपवाद वगळून सुरू आहे म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहोत आसे ही महारुद्र पाटील व वसंतराव आरडे म्हणाले या वेळेस शिवसेना शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर,
सुभाष जगताप माझी सभापती पंचायत समिती इंदापूर नामदेव बनकर माजी सरपंच ग्रामपंचायत वरकुटे बुद्रुक वैभव जामदार बेलवाडी नवनाथ सुतार भिगवन शिवसेना युवा समन्वयक इंदापूर तालुक्यातून इतर कार्यकर्ते उपस्थित होते,अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीसा होईल, असे महारुद्र पाटील म्हणाले आहेत.
Comments
Post a Comment