इंदापूर तालुका प्रतिनिधी...धनश्री गवळी माय मराठी न्यूज....
विविध कार्यक्रमाचे आयोजन
74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी इंदापूर येथील राष्ट्र सेवा दल शाखा सावतामाळी नगर (नागझरी मळा) येथे सकाळी एबी एस जिमचे मालक आणि ट्रेनर मोहसिन शेख आणि AB.7 जिमचे मालक आणि ट्रेनर मेराज शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला ,या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास कदम, सेवा दलाचे जेष्ठ, संभाजीनाना व्यवहारे,आर.पि.आय.चे पुणे जिल्हा सचिव संदिपान कडवळे,तानाजी धोत्रे,मा.नगरसेवक अतुल शेटे,मा.विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, युवक नेते ,बंडा पाटील,शुभम पवार ,सेवा दलाचे शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे,दक्षता समिती सदस्या रेश्मा शेख,प्रा. सौ.जाधव , सौ.देवकर सेवा दलाचे महाराष्ट्र संघटक गफूर सय्यद, भटक्या विमुक्त जमातींचे नेते रामभाऊ काळे ,भाजपचे चाॅद पठाण, तक्वा फौंडेशनचे मुन्ना बागवान अंगणवाडी क्रमांक 57 व 58 चे विद्यार्थी,शिक्षक अणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना ,या दरम्यान राष्ट्र सेवा दल शाखेच्या विद्यार्थ्यांची गाणी, लाठीकाठी, डान्स, आणि भाषणे झाली.
सोलापूर सिधेश्वर ब्लड बँक यांचे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते ,35 बाटल्या रक्त संकलन केले ,
एच .व्ही. देसाई नेत्ररुगणालय मंहमदवाडी हडपसर ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व अल्प दरात नंबरचे चेषमे वाटप करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या शिबीरामध्ये 127 जणांची तपासणी करण्यात आली त्यातील 13 मोती बिंदू चा आजार असणारे रुग्ण सापडले त्यांचे शस्त्रक्रिया करण्याचे फाॅर्म भरून घेतले 10 फेब्रुवारी च्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल,तर 45 जनांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले
प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष होते.
Comments
Post a Comment