श्री. गिरीश घाटे यांच्या 'सांग ना समजेल का ?' या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा
धातुशास्त्रात उच्च पदवीधर असलेले व  गेली पंचवीस वर्षे स्वत:चा व्यवसायात यशस्वी वाटचाल  करीत असलेले श्री. गिरीश  घाटे ठाणे शहरातील प्रतिष्ठीत नागरिक म्हणून प्रसिध्द आहेत. केवळ उद्योजकच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सामाजिक कार्यात सुध्दा त्यांनी आपला ठसा उमटविला असे श्री. गिरीश  घाटे यांनी वयाच्या साठ वर्षांनतर साहित्य क्षेत्रात काही भरीव कार्य करावे या उद्देशाने सध्या त्यांनी लेखन क्षेत्रातहि पदार्पण केले आहे. 

सांग ना समजेल का? हा श्री गिरीश घाटे यांनी लिहिलेला एक मराठी कविता संग्रह आहे. प्रेम, तत्वज्ञान, व्यंग, इत्यादी भावनांवर आधारित या कविता असून, गजल, ओव्या, चारोळ्या, अशा अनेक वाङ्मय प्रकारात गुंफल्या आहेत. कविता अतिशय सोप्या आणि प्रचलित शब्द वापरून केल्या आहेत.

त्यांनी लिहिलेली 'सांग ना समजेल का ?' या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सत्कार रेसिडेन्सी, वर्तक नगर , येथे प्रसिद्ध पत्रकार श्री मिलिंद बल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली व  सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक दा. सु. वैद्य यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यावेळी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे , ज्येष्ठ समिक्षक अनंत देशामुख आणि मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे चे अध्यक्ष श्री. विद्याधर ठाणेकर उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाचे यूट्यूब द्वारा थेट प्रक्षेपण केले जाईल. बाहेरगावच्या कलाप्रेमीना थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल..

Comments

Popular posts from this blog