केनवड येथे शिवजंयती निमित्त
अरोग्य शिबिर
संपन्न
_उकंडी ढेंबरे वाशिम जिल्हा प्रतिनिधी
_
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त केनवड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत सर्व रोगनिदान अरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रमीण भागातील शेवटच्या माणसाला अरोग्य सेवा देण्या साठी भूमिपुत्र शेतकरी संघटना, उदयगीरी नेत्र रूग्णालय उदगिर, विश्व अदिवासी आश्रम शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष केनवड येथिल जेष्ठ नागरिक माजी प.स. सदस्य नामदेवमामा खराटे हे होते. उद्घाटक म्हणून भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत विश्वनाथ शेवाळे साहेब, अरोग्य अधिकारी इंगळे साहेब, डॉ. पांडे साहेब, अपर्णा डबिर मॅडम, डाॅ जाजु साहेब नेत्र रोग तपासणी साठी नेत्र रोग तज्ज्ञ डॉक्टर सुल्ताने हे सेवा देण्यासाठी उपस्थित होते. गजानन जाधव, रविंद्र चोपडे, विकास झुंगरे, प्रशांत खराटे, प्रमोद मोरे, पींटु वाळुकर, विष्णु बाजड, केशवराव जाधव, डाॅ. संतोष बोरकर, विशाल केनवडकर, ज्ञानबा पाटील बाजड, दिपक शेवाळे, अमोल बाजड, सरपंच संदिप गोळे, अजय जाधव, उपसरपंच विकास खराटे, रविंद्र पाटील खराटे तंटामुक्ती अध्यक्ष केनवड, माणिक पाटील खराटे पोलीस पाटील, प्रभाकर बाजड, गुणवंतराव खराटे, प्रमोद देशमुख, शंकरराव सरोदे, जीवन पाटील वानखेडे, आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. मानवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या केनवड येथिल बाजारातील पुतळयाचे पुजण करण्यात आले. अरोग्य केंद्रात उद्घाटन करून शिबाराला सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलतांना विष्णुपंत भुतेकर यांनी जंयती आणि पुण्यतिथीनिमित्त समाजाने अंतर्मुख होऊन कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत शेतकरी शेतमजूर केंद्र बिंदु माणुन काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिबिरासाठी केनवड सह कळमगव्हाण, चांडस, कुकसा, गणेशपुर, जोगेश्वरी, अंचळ, नेतन्सा, जायखेड, तपोवन, बेलगांव येथिल गरजु रूग्णांनी लाभ घेतला. शिबाराचे आयोजन भूमिपुत्र चे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ शेवाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. संतोष बोरकर यांनी तर आभार शिबिर संयोजक महाविर पवार यांनी मानले.
Comments
Post a Comment