शिराढोण येथे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक सलोखा चषक भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 26 मार्च रोजी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले
या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील एकूण 25 संघाने सहभाग घेतला आहे उद्घाटन सामना कळंब पोलीस स्टेशन व शिराढोण पोलीस स्टेशन यांच्यामध्ये खेळवण्यात आला यामध्ये शिराढोण पोलिसांनी हा शुभारंभाचा सामना जिंकला आहे शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामीण भागातील येणाऱ्या संघातील खेळाडूंना नाश्ता व चहापाण्याची सोय करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश शिराढोण पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे जमादार अनिल तांबडे दयानंद गादेकर श्रीकांत लाकाळ परमेश्वर कदम शेंडगे बाबा उंबरे यांच्यासह , शिराढोण येथील व परिसरातील राजकीय सामाजिक मंडळी व खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog