ग्रामपंचायत सुरवड, प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व आरोग्य उपकेंद्र सुरवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ........
इंदापूर तालुका प्रतिनिधी.....

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आज ग्रामपंचायत सुरवड व  प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व आरोग्य उपकेंद्र सुरवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
 या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी ,व इतर सामान्य आरोग्य तपासणी आदी तपासण्या केल्या. यावेळी किशोरवयीन मुलींचे एच,बी, तपासण्या करण्यात आल्या,तसेच अनेकांना औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 176 पुरुष,महिला यांचा समावेश होता . तसेच लहान बालके यांच्या ही तपासण्या करण्यात आल्या. तर 153 जणांचे एक्स-रे काढण्यात आले. या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ताटे सर व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगावकर सर यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच सहदेव मोहिते वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, रणजीत खेडकर वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सागर शिंदे क्ष-किरण तंत्रज्ञ तसेच स्मीअर पॅथॉलॉजी टीम इंदापूर आदींनी ग्रामस्थांच्या तपासणी केल्या. या शिबिरासाठी श्रीमती, कल्पना बुधावले आरोग्य सेविका, श्री. बाबासाहेब मोरे आरोग्य सेवक व आशा सेविका अर्चना माने, रूपाली पांढरे, सुलोचना बनसुडे, संगीता फलफले, सीमा तिकोटे आदींनी परिश्रम घेतले.तर सरपंच सौ.योगिता तुकाराम शिंदे, ग्रामसेवक प्रल्हाद आबनावे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत सुरवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले...

Comments

Popular posts from this blog