पळसदेव कुस्ती आखाड्यासाठी रु. 20 लाखाचा निधी - हर्षवर्धन पाटील 
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी .

             पळसदेव येथील कुस्ती आखाड्याच्या विकासासाठी रु. 20 लाखाचा निधी जिल्हा नियोजन विकास मंडळातून देण्याची घोषणा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.6) केली.
              पळसदेवचे ग्रामदैवत पळसनाथांच्या  यात्रे निमित्त आयोजित भव्य कुस्ती आखाड्यास हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या  मल्लांशी संवाद साधला. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पळसदेव गावाला कुस्तीची ऐतिहासिक परंपरा आहे. येथील नागरिक कुस्तीवर प्रेम करणारे आहेत. पळसनाथ यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी आयोजित कुस्ती आखाड्यास राज्यभरातील नामांकित मल्ल हजेरी लावतात. त्यामुळे येथील कुस्ती आखाड्याच्या विकासासाठी रु. 20 लाखाचा निधी दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. सदर घोषणेचे ग्रामस्थांनी, कुस्ती शौकिनांनी स्वागत केले. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांचा पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
______________________________
फोटो:- पळसदेव येथील पळसनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली.

Comments

Popular posts from this blog