सहा वर्षीय नुजत ने केला रमजान चा पहिला रोजा पुर्ण
कळंब  -:- येथील नुजत सलमान मुल्ला या सहा वर्षाच्या या चिमुकलीने कडक असा रमजानचा उपवास (रोजा) धरला आहे. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाम धर्मीयांमध्ये 7 वर्षानंतर रोजा पकडणे अनिवार्य असते. मात्र कळंब येथील नुजत हिने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला. यंदाचा रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे, त्यात नुजत फक्त 6 वर्षाची आहे म्हणून त्याचे आई-वडील त्याला नकार देऊ लागले. परंतु दोन- तीन तास उपाशी राहून नुजत रोजा सोडेल या उद्देशाने तीला रोजा करण्यास सांगितले. मात्र तीने तब्बल 13 तास 30 मिनिटे अन्न- पाण्याविना 5 वेळेसच्या नमाजसह रोजा पूर्ण केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनली आहे. नुजत ही पत्रकार सलमान मुल्ला यांची मुलगी आहे...

Comments

Popular posts from this blog