भूमिपुत्रच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आत्माराम सुतार यांची नियुक्ती.
_वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे_
वाशिम: शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अनेक सामाजिक संघटनांमध्ये काम केलेले आत्माराम सुतार यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे यांची उपस्थिती होती.
आत्माराम सुतार हे मागील २० वर्षांपासून विविध संघटनांमध्ये, चळवळी मध्ये कार्यरत आहेत. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी अनेक आंदोलनं, मोर्चे त्यांनी यशस्वी केले आहेत. यापुठे जिल्ह्यात भूमिपुत्र संघटना वाढवून शेतकरी, शेतमजूर, तरुण यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करू असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे.
Comments
Post a Comment