18 जुन शेतकऱ्यांनी काळा दिवस म्हणून पाळावा....
विष्णुपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना
वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे
देशातील पहिल्या घटना दुरूस्तीने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. देश 15 आगष्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. 26 जानेवारी 1950 ला देशाने घटना स्वीकारली आणि 18 जुन 1951 ला पहीली घटना दुरूस्ती करून देशातील शेतकऱ्यांना कायदेशीर गुलाम बनवण्यात आले. त्यामुळे 18 जुन हा दिवस देशातील शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आसुन शेतकऱ्यांनी या दिवसी व्यवस्थेचा निषेध नोंदविला पाहीजे आस्या प्रकारचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केले आहे.
शेतकरी विरोधी कायदे करून फक्त आमचे तात्कालीन राज्यकर्ते थांबले नाहीत. तर हया कायदया विरोधात न्यायालयात न्याय सुध्दा मागता येणार नाही याचीही व्यवस्था करून ठेवण्यात आली. 18 जुन 1951 ला जी घटना दुरूस्ती करण्यात आली त्यासाठी परिशिष्ट नव (9) जोडण्यात आले व परिशिष्ट नव मध्ये जे कायदे टाकण्यात आले त्यांना न्यायालयाच्या कक्षे बाहेर ठेवण्यात आले. आज परिशिष्ट नव मध्ये 280 कायदे टाकण्यात आलेले आहेत त्या पैकी 250 कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासाठी हयाच घटनादुरुस्तीने खर्या अर्थाने सुरुवात झाली. आज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी 18 जुन 1951 च्या कायद्यामुळे होत आहे . 1955 ला आलेल्या जीवन आवश्यक वस्तु कायदयाने तर शेतकऱ्यांना वेठबिगार बनवले. अन्न सुरक्षा कायद्याने शेतकऱ्यांची सुरक्षा काढुन घेण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांनी 18 जुन हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला पाहीजे आसे भूमिपुत्र कडुन शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment