सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! खुनाचे गुन्हातील आरोपी टोळक्यास 48 तासात केले अटक
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १६/०६/२०२३ रोजी रात्री ७१.५० वा. चे सुमारास फिर्यादी शिवलींग ज्ञानदेव पांढरे व मयत वैभव विठ्ठल गायकवाड हे अॅक्टीवा गाडीवरून मिठाचे गोडावून पाठीमागे फुरसुंगी रोडने जात असताना गाडीमागुन आलेल्या दोन मोटार सायकल वरील ५ आरोपी यांनी वैभव गायकवाड यांचे मानेवर, गळ्यावर, तोंडावर डोक्यावर, छातीवर हातावर धारदार हत्याराने सपासप वार करून व लाकडी दांडक्याने मारून वैभव गायकवाड याला जीवे ठार मारले. हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ८८९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२,९४३.१४४, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७( ९ ) सह ९३५. भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी प्रतिक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत कटके व स्वराज दोरगे यांचे बाबत तपासपचकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे व अमलदार यांनी माहीती घेतली असता, ते गुन्हा झालेनंतर फरार झाले होते. आरोपी यांचे शेवटचे लोकेशन पाहीले असता ते स्वामी चिंचोली, रावणगाव खडकी या भागातील पहाटेच्यावेळी असल्याचे दिसले. लागलीच तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. आरोपींबाबत पुढे काहीएक उपयुक्त माहीती मिळत नसल्याने तपास पथकाने पुणे सोलापूर हायवेवरील रोडने मिळणा-या सीसीटीव्ही फुटेज आधारे तिन दिवस भुणों, कुर्डुवाडी, माढा राग या भागातील ३०० हून अधिक फुटेज तपासात आरोपींचा माग काढला. आरोपी हे वैराग ते माळवंडी पासून पुढे गेले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर हडपसर तपास पथकाने वैराग इले, सुर्डी, माळवंडी या ग्रामिण भागात स्थानिक नागरिक, पोलीस पाटील यांचे मदतीने माहीती काढत आरोपी यानी माळवंडी भागत वास्तव्य करून परत ते पुण्याचे दिशेने रवाना झाले बाबत माहीती मिळवली. तपासपथकाने आरोपींचा जाण्याचा मार्ग निश्चीत करून त्या मार्गावरिल फुटेत तपासात आरोपी हे सोलापूर पुणे हायवेने जात असल्याबाबत उपयुक्त माहीती गोळा करून आरोपीचा पाठलाग करत आरोपी १) प्रतिक पोपट कामठे वय २४ वर्ष रा. बेंदवाड़ी फुरसुंगी पुणे २) शुभम सुधाकर गायकवाड वय २१ वर्ष रा. सदर ३) आशितोष ऊर्फ सोन्या शरद पोर्ट वय २१ वर्ष रा. जैननगर फुरसुंगी पुणे ४) स्वराज सुनील दोरगे वय १९ वर्ष रा बंदवाडी फुरसुगी पुणे ५) अनिकेत ज्ञानेश्वर कटके वय १९ वर्ष रा. वंदवाडी फुरसुंगी पुणे याना वो दौड येथून ताब्यात घेतले. आरोपीना हडपसर पोलीस ठाणेस घेवून येवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी मयत वैभव गायकवाड याचबरोबर ऊरूसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे सांगीतले. पुढील तपास प्रतापसिंह शेळके, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री विश्वास उगळे सो पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, भगवान हंबडे, अनिरूध्य सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत जीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
Comments
Post a Comment