श्री हनुमान विद्यालय अवसरी ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम......
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी.
शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी एसएससी परीक्षे चा निकाल पुणे माध्यमिक उच्च माध्यमिक,बोर्डाने जाहीर केला.
यामध्ये इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय अवसरी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यावेळी विद्यार्थ्यांमधून 26 विद्यार्थी
परीक्षेस
बसले होते. यामध्ये 14 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये पास झाले आहेत. प्रथम श्रेणी मध्ये आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये तीन विद्यार्थी,तर एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक. पुनम नंदकुमार कवितके,92%60.
द्वितीय क्रमांक. ज्योती महादेव बोराटे,88%40.
तृतीय क्रमांक. प्रज्ञा शामराव बाबर,87%60.
विद्यालयामधील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन विद्यालयातील मुख्याध्यापक श्री लोंढे सर श्री घळके सर,श्री राऊत सर, गवळी सर, श्री रसाळ सर,सौ,कवडे मॅडम, लोंढे मॅडम, लिपिक शिंदे पाटील,सेवक,कवितके मामा,पेंडवळे मामा,मगर मामा, यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, व शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अरुण दादा शिंगटे, तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका सौ विजया अरुण शिंगटे यांनी सर्व स्टाफचे कौतुक केले.
विशेष कौतुक पालकांमधूनही मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
Comments
Post a Comment