रिसोड तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान ग्रस्त शेतकरी अद्यापही मदती पासुन वंचित
विष्णुपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष
भूमिपुत्र
शेतकरी संघटना
म.रा.
_वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे_
रिसोड तालुक्यातील मागील खरीप हंगामात आनेक मंडळात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे उभ्या पीकाचे व पक्व झालेल्या सोयाबीन, तुर, कापुस व इतर पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. सर्व्हे होवुन मदतही जाहीर झाली. आपत्ती ग्रस्त आनेक शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पंरतु आदयापही तालुक्यातील अनेक शेतकरी मातीपासून वंचित आहेत. चार गावे अतिवृष्टी ग्रस्त मदती पासुन वंचित आहेत तर सततच्या पावसाने नुकसानग्रस्त तर दोन मंडळे वंचित आहेत. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील शेतकरी वंचित आसुन गेल्या आठ ते दहा महिन्यापासून शेतकरी तहसील कार्यालयाचे खेटे घेत आहेत. खरीपातील दुसर्या पेरणीच्या कामी मदत पडेल या आपेक्षेत शेतकरी आहेत. लवकर मदत मीळावी म्हणून भूमिपुत्रचे तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे यांनी रिसोड तहसीलदारांना निवेदन दिले असून मदत लवकर प्राप्त न झाल्यास भूमिपुत्र कडुन रिसोड तहसील प्रशासनाला अंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याचे भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले आहे.
Comments
Post a Comment