सोलापूर माय मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी वैभव यादव

जागतिक योग दिनाच्या औचित्य साधून भारती विद्यापीठ अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने योगा दिन साजरा करण्यात आला.
जागतिक योग दिनाच्या औचित्य साधून भारती विद्यापीठ अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस.बी. सावंत यांनी उपस्थितांना योग अभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक फायदे विशद केले. प्रा. शिवगंगा मैंदर्गी यांनी सर्वांना योगासनाचे धडे दिले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी आभार मानले. सदर योग शिबिरासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog