फिनिक्स पोदार लर्न स्कूल येथे विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
दिनांक 28 जून रोजी फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त वारकरी पालखी व दिंडी काढण्यात आली
         यावेळी नर्सरी,सिनियर केजी जुनिअर केजी, पहिली आणि दुसरी या वर्गातील विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून तसेच काही विद्यार्थ्यांनी विठू माऊली,रुक्मिणी,तुकाराम महाराज, मिराबाई इत्यादींचा पोशाख परिधान करून तर काहीजणांनी हातात भगव्या पताका आणि गळ्यात टाळ घेऊन सहभागी होऊन या दिंडीची शोभा वाढवली आणि काही विद्यार्थ्यांनी विठू माऊली चे अभंग गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व पालक वर्गातून या दिंडीचे कौतुक करण्यात आले
        दिंडीची सुरुवात शाळेचे प्राचार्य श्री लोकेश कुमार शहा सर उपप्राचार्य अमोल गाडे सर यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे संगीत शिक्षक निलेश मांजरे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विजय ढगे सर यांनी केले

Comments

Popular posts from this blog