दिव्य मराठी आणि बी एम आय टी कडून गुणवंतांचा सत्कार
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
नेहमीच विविध समाजउपयोगी उपक्रम राबविणाऱ्या दैनिक दिव्य मराठीने यंदा ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायोजित दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा 30 जून सायंकाळी पाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय येथील किर्लोस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता शालेय जीवनातील दहावी व बारावीच्या टप्प्यावर मिळालेले यश हे आयुष्यातील पुढच्या यशाची मूर्तमेढ असते ही मुहूर्त वेळ होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रतिमेचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठी व ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे सर्व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला सत्कार सोहळ्याचे सहप्रायोजक म्हणून पृथ्वीराज माने सर , विजय कबाडे सर, राजेंद्र हजारे सर यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment