प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ
माय मराठी न्यूज चॅनल सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ जि.प.सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सर यांच्या हस्ते संपन्न झाला
प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य हे स्तुत्य असून ते निराश्रित,बेघर,अनाथ वयोवृद्ध लोकांना आधार देण्याचे काम करत आहेत.निश्चितच निराश्रित वयोवृद्ध लोकांसाठी हा प्रकापल्प आधारवड बनेल.येणाऱ्या काळात संस्थेला मी माझ्या परीने व प्रशासनाकडून जितकी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन असे मत जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सर यांनी व्यक्त केला.
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सर यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी ते बोलत होते
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील,वंचित,भिक्षा मागणाऱ्या,स्थलांतरित मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले जाते तसेच संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराश्रित,बेघर,अनाथ,वयोवृध्दां आधार मिळावा या साठी मोफत (निःशुल्क) वृद्धाश्रम चालवले जाते.त्याच बरोबर सामाजिक विविध विषयांवर संस्था कार्य करते
पायाभरणी समारंभास मोरवंची गावच्या सरपंच प्रियांका धोत्रे,BDO आनंद मिरगणे,माविम चे अधिकारी सोमनाथ लामगुंडे,माधवी रायते,सीमा किणीकर,सोमनाथ राऊत,ग्रामसेवक,मुख्याध्यापक प्रकाश खेलबुडे, विद्या लिमये,विष्णू तुपे,शारुख बागवान,शेखर दिवसे,साहेबराव पराबत, प्रार्थना फाऊंडेशनचे सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment