वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त करण्यात आले...
माय मराठी सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव.

      प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेले वृद्धाश्रम निराधार वयोवृद्ध लोकांसाठी मंदिर बनेल तर समाजासाठी एक आदर्श प्रकल्प बनेल...कुमार करजगी
     प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून 2018 पासून विविध सामाजिक विषयांवर काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यातीलच वृद्धाश्रम हा एक निवासी प्रकल्प...
   आज समाजात कित्तेक निराधार,बेघर,अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात.काहींना कुटुंब परिवार असतो तर काहींना नसतो.कित्तेक आज्जीआजोबांना घरी सांभाळलं जात नाही,घरातून हाकलून दिले जाते,कित्येकदा त्यांना कुठे तरी रस्त्याच्या,स्टेशन किंवा मंदिर परिसरात आणून सोडले जाते.अशा सर्व वयोवृध्द गरजू आजीआजोबांना आधार देण्यासाठी प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मोरवंची येथे मोफत(निशुल्क) वृद्धाश्रम चालवले जाते.त्याचे उद्घाटन आपण पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या हस्ते केले होते.पण वाढत्या आजीआजोबांची संख्या पाहता त्यांना एक स्वतंत्र निवारा हवा होता.आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त वृद्धाश्रमच्या नूतन इमारतीच्या जागेचे भूमिपूजन कुमार करजगी (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले.
    कुमार करजगी यांनी सर्व आजीआजोबांची प्रेमाने चौकशी केली सर्वांची सुखदुःख ऐकून घेतली व त्यांच्याशी गप्पा मारल्या,प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था समाजाच्या हिताचे भरीव कार्य करत असून भविष्यात संस्था सामाजिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करील यात कोणतीच शंका नसल्याचे सांगितले तसेच वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू होऊन ते पूर्णत्वास जाईल असा विश्वास व्यक्त केला....
   भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मोरवंची गावचे सरपंच राहुल धोत्रे,माझी आई संगीता मोहिते,सचिव अनु मोहिते,आजीआजोबा व ग्रामस्थ उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog