गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा भव्य सन्मान करणेआपले कर्तव्य..... विलासराव गाढवे
इंदापूर... प्रतिनिधी.... धनश्री गवळी 

आज गुरु पौर्णिमा, तुम्ही सर्व गुरूजन ज्ञानदानाचे काम योग्य प्रकारे करत आहात त्याबद्दल आपल्या विद्यालयातील सर्व गुरूजनांना गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा फुल ना फुलाची पाखळी म्हणून साप्ताहिक लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव जी गाढवे व साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर पाटील या दोन्ही साप्ताहिका तर्फे सर्व गुरूजनांना छोटीशी भेट म्हणून भिंती वरील घड्याळ व दिनदर्शिका भेट म्हणून सर्व गुरूजनांना दिली या वेळेस माजी सैनिक विलासराव गाढवे म्हणाले की, पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी चारही वेदांची रचना केली आणि म्हणूनच त्यांना वेद व्यास असे नाव पडले, असेही शास्त्रात सांगितले आहे.या वेळेस श्री विकास फलफले मुख्याध्यापक, सुनिल माळी, शंकर हुबाले, चंद्रकांत काळे, कालिदास मोरे , गोरू मेंगाळ , जयश्री झगडे,वर्षा कचरे,शितल जाधव, स्वाती पडळकर, रविंद्र माने सह इतर मान्यवर उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog