भाटनिमगाव बेडशिंगे दोन गावाच्या दरम्यान जंगली प्राणी आढळला......
इंदापूर.... धनश्री गवळी
इंदापूर तालुक्यातील बेडसिंगे भाटनिमगाव गावाच्या दरम्यान मलबार गंध हा जंगली प्राणी आढळून आला. हा प्राणी शुक्रवारी सकाळी दहा वाजायच्या सुमारास श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील शिक्षिका अरुणा सर्जेराव कवडे यांना दिसून आला.
मलबार गंध हा प्राणी मारजर प्रजाती मधीलआहे. या प्राण्याचा मानवास धोका कमी आहे परंतु प्राणी मांसाहारी आहे. हा प्राणी भारतातील पश्चिम भागामध्ये आढळून येतो परंतु आता जंगले नष्ट होऊ लागल्यामुळे पाण्याची प्रमाण कमी झाल्यामुळे जंगली प्राण्यांना अन्नाच्या शोधासाठी आता इतरत्र वास्तव करू लागलेले आहेत असेच यावरून दिसून येते हा प्राणी सस्तन धारी वर्गामध्ये येतो हा भूचर प्राणी आहे सध्या ही प्रगती नष्ट होऊ लागली आहे ही फार मोठी चिंताजनक बाब आहे जंगले नष्ट झाल्यामुळे हा प्राणी असुरक्षित झाला आहे. गेल्या काही महिन्यातच तालुक्यातील कांदळगाव येथील रान रेडा हा प्राणी आढळून आला होता या प्राण्यामुळे मानव जातीस व पशुंना धोका निर्माण झाला होता. यातच आणखीन भर म्हणून बेडशिंगे भाटनिमगाव भागांमध्ये हा प्राणी आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Comments
Post a Comment