इंदापूर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी.

   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
   प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,' लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समजल्यावर माणसाना जगण्याचा अर्थ कळतो. कामगारांना त्यांचे अधिकार कळतात. समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले. प्रत्येक महापुरुषाचे कार्य समाजातील तरुणांना नवीन विचार देतात.
   डॉ. शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर व सहकारी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते .   
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog