भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूर यांच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला अभिजीत कदम मॅनेजमेंट सोशल सायन्स, संचालक डॉ. एस. बी. सावंत, समाजकार्य विभागाचे संचालक डॉ. डी.सी.कीर्तीराज, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस. के. मांडके , ग.सा. पवार प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विजया गोळे, बालविकास विभागाच्या प्राचार्या सौ. वैशाली मोहोळे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व उपस्थित शिक्षकांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनाच्या औचित्य साधून सर्व शाखाप्रमुखांनी समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांची असणारे योगदान याविषयी आपले मत प्रदर्शन केले. तसेच विविध शाखातील शिक्षकांनी आपले मनोगतामध्ये भविष्यातील शिक्षकांचा जबाबदाऱ्या आणि बदलत्या शिक्षण व्यवस्थेसोबत शिक्षकांनी बदल आत्मसात करण्यासंदर्भात महत्व प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला सर्व शाखा मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. पी.पी. कोठारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डॉ. ए.बी.नदाफ यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog