पुणे जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धेत श्री हनुमान विद्यालयाचे उड्डाण......
धनश्री गवळी.
पुणे जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धा दिनांक 26 रोजी बारामती क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या होत्या, या क्रीडा स्पर्धेत श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील इयत्ता आठवी शिकणारा विद्यार्थी अभिषेक कालिदास मोरे याने जुदो स्पर्धेमध्ये वय वर्ष14 मुले,व वजन गट 50ते60 या गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. म्हणूनच संस्थेचे चेअरमन श्री अरुण शिंगटे व विजया शिंगटे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याआहेत.तसेच आज श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक मोरे यांचा हार घालून सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला.
या विद्यार्थ्यास मार्गदर्शन विद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख श्री तानाजी राऊत सर व पांडुरंग गिरी सर यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक श्री नाना घळके सर, दत्तात्रय गवळी सर,अरूण रसाळ सर, शांतीलाल शिंदे, शिक्षिका अरुणा कवडे, ज्योती लोंढे, शिक्षकेतर कर्मचारी हरीदास कवितके, राजेंद्र पेंडवळे, प्रकाश मगर इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment