डॉक्टर शिंगटे यांना भारतभूषण पुरस्कार जाहीर......
इंदापूर तालुका प्रतिनिधी..... धनश्री गवळी.
इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील लहान गावातील कर्तव्यदक्ष डॉ.धिरज शिंगटे यांना भारत भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
कोल्हापूर जिल्हा दै.रोखठोक च्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र तून कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जातो, यांमध्ये इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील गरीब कुटुंबातून परिस्थिती वर मात करत चिकाटीने अभ्यास करून डॉ.शिगटे यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन दसरा चौक येथे जगद्गुरु विद्या नरसिंह भारती शंकराचार्य व उपजिल्हाधिकारी शिवाजीराव शिंदे पुणे ,संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस निरीक्षक डी.वाय.एस.पी.मोतीलाल मोरे यांच्या हस्ते पुरस्कार दिनांक 6 सप्टेंबर 2023 बुधवारी दुपारी 4, वाजता प्रदान करण्यात येणार आहे,असे दै . रोखठोक चे संपादक सुरेश माडकर यांनी पत्र देऊन सांगितले आहे.
Comments
Post a Comment