इंदापूर तालुका माध्यमिक
 व उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा आनंदात.......
इंदापूर प्रतिनिधी....धनश्री गवळी.
   इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्थेची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा नीतू मांडके हॉल इंदापूर येथे संपन्न झाली.
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सभापती माननीय श्री नाना घळके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक गायकवाड सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला तसेच लेखा परीक्षण करण्यास आलेले जमा खर्च नफा तोटा पत्रक व ताळेबंद यावर चर्चा केली तसेच २०२३/२४ या कालावधीचे अंदाजपत्रक मंजूर करणे, विमा संरक्षण,  संस्थेचे भाग भांडवल मर्यादा वाढवणे, थकबाकी वसुली बाबत चर्चा करण्यात आली तसेच सभासद मासिक वर्गणी वाढवणे अशाप्रकारे सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मार्च 2023 च्या इयत्ता दहावी व बारावी मधील विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव उपस्थित त्यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेची सभासद संख्या 158 असून संस्थेचे भाग भांडवल 1,86,92,250 एवढे आहे ‌.तर मुदत ठेव 1,34,17,570एवढी आहे. संस्थेचा व्याजदर 10.5/ आहे.तर आभाष दर दहा टक्के एवढा आहे. या कार्यक्रमासाठी पतसंस्थेची सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेचे  उपाध्यक्ष संजय झगडे, सदस्य बळीराम चव्हाण, लक्ष्मण बागल, महेश हेंद्रे, अनिल जाधव, निशिकांत ढोले, दशरथ बाबर, राजाभाऊ सोनमाळी, मधुकर शिंदे, सौ,किरण थोरात, ज्योती लोंढे, सुभाष गायकवाड, तानाजी उचाळे, तसेच मान्यवर संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना,शिंदे पाटील, गुंड सर, शेंडगे सर, विलास  गाढवे सर,देवकर सर, रसाळ सर हरीदास कवितके, राजेंद्र पेंडवळे,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शिवाजी कुदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन झोळ सर राधिका हायस्कूल यांनी केले.

Comments

Popular posts from this blog