राजवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर  फुलांची चादर अर्पण करीत घेतले दर्शन
   तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील गाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान होत असून आज दि.6 ऑक्टोंबर रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी या उरुसानिमित्त सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर  फुलांची चादर अर्पण करीत दर्शन घेतले.
    मोठ्या भक्ती भावाने हा उरूस साजरा होत असतो.मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात. राजवर्धन पाटील यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले तसेच नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
    माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र लुमेवाडीच्या परिसर विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog