मोप ग्रामपंचायत चा अक्रोश पदयात्रेस पाठिंबा _वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे_ _सरपंच ॲड.भागवत नरवाडे यांचे शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे अवाहन_ भूमिपुत्र शेतकरी संघटनांकडून 31 डिसेंबर ला रिसोड ते वाशिम शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पदयात्रा काढली जात आहे. या पद यात्रेस पाठींबा देण्यासाठी व सहभाग नोंदवण्यासाठी मोप येथिल सरपंच अॅड भागवत नरवाडे उपसरपंच काळे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी रिसोड स्थीत भुमीपुत्र कार्यालयात जाऊन भुमीपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची भेट घेतली व अक्रोश पदयात्रेत सहभागी होत पाठिंबा दिला. भूमिपुत्र कडुन मोप ग्रामपंचायत व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजुपाटील डांगे, गजानन सदार, रामेश्वर सदार, रवि जाधव यांच्यासह भूमिपुत्र चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Posts
- Get link
- X
- Other Apps
व्याड चिखली रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्तारोको आंदोलन. वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे वाशिम:- आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी मौजे व्याड ते चिखली फाटा या नादुरुस्त असलेल्या रस्ता संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने दि 26/10/2023 रोजी मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. किंवा या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. म्हणून आज सोमवार दिनांक 06/11/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता व्याड फाटा रिसोड रोड चिखली येथे वंचित बहुजन आघाडी वाशीमच्या जिल्हाध्यक्ष सौ किरणताई गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष किरणताई गिर्हे यांनी जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहु. त्याअगोदर दिवाळीपूर्वी याची तात्पुरती डागडुजी करून सदर ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी करून तत्काली...
- Get link
- X
- Other Apps
तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर यांनी केला कर्तुत्वान महिलांचा सन्मान...... इंदापूर/धनश्री गवळी. तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने पंचायत समिती इंदापूर येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली. यावेळी कार्यक्रमास मान्यवर म्हणून राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे, म्हणून राहुल मखरे,बि,एम,पी, मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर, पांडुरंगाच्या मारकड, उपसभापती इंदापूर, महेंद्र दादा रेडके, तसेच सिने अभिनेत्रीम् मिताळी कोळी, अपेक्षा पांचाळ हे उपस्थित होते. महिलांनी चूल आणि मुल एवढेच न पाहता समाजामध्ये वावरत असताना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, क्रीडा कला , तसेच नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत, अशा महिलांचा सन्मान करणे हे महत्त्वाचे आहे असे तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ अनिता खरात यांन...
- Get link
- X
- Other Apps
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून दसरा मेळावा साठी विशेष रेल्वे चे आयोजन.... (प्रतिनिधी :-) दरवर्षीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन जाण्यासाठी " स्पेशल तुळजाभवानी एक्सप्रेस" चे आयोजन केले आहे... सदर रेल्वे दिनांक 23 ऑक्टोबर 23 रोजी सायंकाळी 10.30 वाजता धाराशिव मधून मुंबई कडे प्रस्थान करणार असून या रेल्वेत उमरगा, लोहारा, कळंब, धाराशिव, तुळजापूर,वाशी, औसा आणि निलंगा तालुक्यातील शिवसैनिकांनी धाराशिव येथे उपस्थित रहावे तर भूम, परंडा आणि बार्शी तालुक्यातील शिवसैनिकांनी 11 वाजता बार्शी रेल्वे स्थानकावरून रवाना व्हावे या रेल्वे प्रवासात, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील,शंकरराव बोरकर, माजी आ. दिनकर माने,नंदूराजे निंबाळकर,संतोष सोमवंशी,जेष्ठ नेते बाबा पाटील,रणजित पाटील, अक्षय ढोबळे, बार्शी तालुकाप्रमुख प्रवीण काकडे आदी उपस्थित असणार आहेत
- Get link
- X
- Other Apps
सोयाबीनचे भाव वाढणार _शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये_ विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे महाराष्ट्रातील मुख नगदि पीक सोयाबीन आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी 40% सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो . विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचे खरीपातील मुख्य पीक सोयाबीन आसुन वर्षभराचे अर्थकारण सोयाबीन पीकावरच अवलंबून आसते. राज्यातील सोयाबीन उत्पादक सोयाबीनच्या बाजारातील भावा मुळे प्रचंड आडचणीत आला आसुन दहा वर्ष आधीचे दर आज मिळत आहेत. सोयाबीनच्या उत्पादन खर्चात मात्र दुप्पट वाढ झालेली आहे. एकरी उत्पादन घटले आसुन भाव पडल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड कोंडीत सापडला आहे. शेतकरी पडेल त्या भावाने माल विकत आहेत काही ठिकाणी तीन हजार रूपये प्रती क...
- Get link
- X
- Other Apps
रिसोड तालुक्यातील गुरा -ढोरांना जंत व गोचिड नाशक औषधाचे वाटप वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे रिसोड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ चिखली, कार्यक्षेत्रातील हराळ येथे गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांना पोटातील जंत निर्मुलनासाठी जंतनाशक औषधी पाजणे, व बाह्य परोपजीवीच्या प्रतिबंधासाठी गोचीड नाशक औषधीचे वाटप करण्यात आले. पाळीव जनावरांना जंत व गोचीडापासून इजा पोहोचते व अनेक मार्गांनी आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरते. जंत व गोचीड प्रत्यक्षरीत्या जनावरांना अति त्रास, दुःखदायक चावे, रक्त शोषण, जखमा करीत असतात. त्याचप्रमाणे इतर अवयवांना आजार आणि पेशीजालात संक्रमण करुन, त्यांच्या शरीरामध्ये सांसर्गिक रोगजंतूंचा प्रसार अथवा रोग प्रसारास मदतीची स्थिती निर्माण करीत असतात. याबाबत पशुपालकामध्ये जनजागृती करण्यात आली. जनावरांच्या गोठ्यात प्रत्यक्ष जावून जंतनाशक औषधी पाजणे, व आजारी जनावरांची तपासणी करून उपचारही करण्यात आले. डास, चिलटे, मच्छर, व माशा निर्मुलनासाठी गोठ्यात फवारणी करीता...
- Get link
- X
- Other Apps
राजवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करीत घेतले दर्शन तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील गाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान होत असून आज दि.6 ऑक्टोंबर रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी या उरुसानिमित्त सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करीत दर्शन घेतले. मोठ्या भक्ती भावाने हा उरूस साजरा होत असतो.मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात. राजवर्धन पाटील यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले तसेच नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र लुमेवाडीच्या परिसर विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.